नाशिक : नाशिक रोड रेल्वेस्थानकातील एका हॉटेलमध्ये जेवण करीत असताना नाशिक ग्रामीणच्या पोलिस अंमलदारानेच शासकीय रिव्हॉल्व्हर हॉटेलच्या वेटरवर ताणली आणि धमकावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नाशिक रोड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, संशयित पोलिस अंमलदार हा जिल्ह्यातील एका आमदाराचा अंगरक्षक असल्याचेही समोर आले आहे. विशाल झगडे (रा. नाशिक) असे त्याचे नाव आहे.
