ही महाराष्ट्राच्या इतिहासात पहिली वेळ असेल जीत एका अतिशय घृणास्पद घटने संबंधित गुन्हेगारांच्या विरोधात सत्तेतीलच एक आमदार प्रखर व तीव्रतेणे आवाज उठतो आहे. अगदी विरोधीपक्षापेक्षा ही अधिक. तेही सतेतील एका मंत्र्याच्या व त्याच्या काळ्या सल्तनत विरोधात. त्याच नाव आहे सुरेश धस व घटना अर्थातच संतोष देशमुखांची. वरकरणी ही एक सामन्य गोष्ट वाटेल. पण ती तशी सामान्य नाही नी मराठा वंजारी तर अजिबात नाही. या सर्वांच्या मागे एक व्यक्ती आहे आणि त्याच नाव आहे फडणवीस धस जे ही धाडसाने व अतिशय माहितीपूर्ण बोलत आहे. त्याला बॅकिंग केवळ नी केवळ फडणवीस यांची आहे त्यासाठी त्यांचे अभिनंदन. याच प्रकरणाच्या संदर्भाने धसांनी अंतरा माळीचे नाव घेतले तिने press conference घेत फडणवीसांची भेट घेतली आणि त्याक्षणी धसांनी तिची माफी मागितली. कारण फडणवीसांना या प्रकरणाचा नुसता फडशा नाही पाडायचा तर एका दगडात अनेक पक्षी मारण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. ज्यात ते आजतरी success होतांना दिसत आहे. आणि ते पक्षी आहेत. मराठ्यांना जरांगेंना डावलून नवं व स्वतःच्या नियंत्रणातील धसांचं नेतृत्व देणे. सत्तेत अजित पवारांवर चेक ठेवणे. स्वता व सरकार न्यायप्रिय कसे आहे हे सिद्ध करणे, विरोधीपक्षापेक्षा सत्ताधारीच अधिक आक्रमक आहे हे जनतेत रुजवणे, विरोधकांची धार बोथड करणे. असे आणि अनेक पक्षी सध्या फडणवीस मारू पहात आहे.
पण येथे फडणवीसांच्या एका गोष्टीच कौतुक करावेच लागेल त्यांनी या प्रकरणात अजूनतरी कुणाची भिड ठेवलेली नाही व समतोल ही छान साधला आहे.
