The Sapiens News

The Sapiens News

सुहास कांदे यांच्या विजयाची human psychology

नांदगावची निवडणुक ही महाराष्ट्रातील जनतेसाठी प्रचंड कुतूहलाचा विषय होती आणि पोलीस व इतरही शासकीय यंत्रणांसाठी अतिशय तणावाचा. या मतदारसंघात अगदी रोज High Voltage drama असे. येथे नक्की निकाल काय लागतो ? यापेक्षा मतदाना दरम्यान व निकाला नंतर काय राडा होतो ? हे कुणीही सांगू शकतं नव्हते. निवडणुकीच्या निकालाचेच सांगायचे झाले तर तो सुहास कांदेंच्या बाजूने लागला पण त्याच एक विशिष्ट कारण असावं आणि ते म्हणजे राज्यात भुजबळ हे नाव खूप वजनदार आहे असे मानले जाते. मग ते जनतेत असो की शासन दरबारी भुजबळ या नावाविषयी जनसामान्यातः एक दहशत, प्रेम, आदर अगदी राग, द्वेष ही अशा मिश्रित भावना असल्या तरी लोकांनी भुजबळांच्या तोडीच कुणी पाहिले. भुजबळ हे सर्वांना पुरून उरतात ही धारण लोकांच्यात पक्की रुजली असतांना कोणताही विशेष राजकीय वारसा, पाठबळ नसलेला त्यांच्या सारखा राजकीय व सर्वच अनुभव व कुणी Godfather ही नसलेला एक तरुण ज्याला आमदार होऊनच मात्र अडीचएक वर्षही झाले नसेल. तरी देखील भुजबळांच्या नाकी नऊ आणतो. चिडल्यावर कुणाचीही तमा न बाळगता murder fix, कारे काळ…. अशा कितीतरी शी….हासाडतो तेही साक्षात समीर भुजबळ यांना. हेच नाही मोठ्या भुजबळांना ही आव्हान देतो. हे नाशिककरांनीच काय अवघ्या महाराष्ट्राने प्रथमच पाहिले. खरं की खोटं पण हेच कदाचित मतदारांना भावले असावे. भुजबळांनाही कुणी खुन्नस देऊ शकतो. तेही पोलीसांच्या उपस्थतीत यातच कांदेंच्या विजयाची बीजे पेरली गेली असावी.

समिर भुजबळ यांनी जीवनात अनेक हार जीत पाहिल्या आहेत तसेच कांदेही लढवय्य आहेत त्यामुळे एका निवडणुकीने दोघांनाही फार काही फरक पडणार नाही परंतु जनतेने दिलेला कौल स्पष्ट आहे.

Leave a Comment

Vote Here

Loading poll ...
Coming Soon
Do You Like Our Website?
UPSE Coaching

Recent Posts