The Sapiens News

दि.सेपियन्स न्युज

The Sapiens News

दि. सेपियन्स न्युज

झोडगे मालेगाव येथील पेट्रोल पंपावर दोन इसमांचा गोळीबार व खंडणीची मागणी

झोडगे मालेगाव : येथील भारत पेट्रोलियमच्या पेट्रोल पंपावर खंडणी वा दरोड्याचा हेतूने मोटार सायकलवर आलेल्या दोन इसमांनी मालक कुठे आहे. तात्काळ पंधरा लाख द्या अशी मागणी करत पिसस्तोलचा धाक दाखवून गोळीबार केला या घटनेने एकच दशहात व खळबळ उडाली असून. शनिवारी रात्री १० वाजेच्या सुमारास ही घटना घडला.

हल्लेखोरांनी पंपावरील कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. कर्मचाऱ्यांच्या कानावर पिस्तोल लावत धमावले व गोळीबार ही केला. सुदैवाने त्यात तो थोडक्यात बचावला. हल्लेखोरांनी सदर कर्मचाऱ्यांचा मोबाईल हिसकावून उद्या परत येतो २० लाख तयार ठेव असा दम दिला व धुळ्याच्या दिशेने पोबारा केला. हल्लाचा हा संपूर्ण थरार सिसिटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचारी तेथे दाखल झाले. सीसीटीव्ही फुटेज आधारे पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरु केला असून. सदरचा पेट्रोल पंप मनमाडचे भाजप नेते पंकज खताळ यांच्या मालकीचा असल्याचे समजते.

Leave a Comment

Vote Here

Loading poll ...
UPSE Coaching

Recent Posts