दिंडोरी नाशिक : दीड महिन्यांपूर्वी दिंडोरीच्या जिल्हा परिषद शाळेत दोन शिक्षकांच्यात तुफान हाणामारी झाली होती. त्याचे व्हिडीओ व फोटो ही सोशल मीडियावर प्रसिद्ध झलेले. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई व्हावी यासाठी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी नम्रता जगताप व गटशिक्षणाधिकारी चंद्रकांत गवळी यांनी जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांना तसा अहवाल सादर केला होता.
त्यावर कार्यवाही करीत व गंभीर दखल घेत CEO मित्तल यांनी दोघा शिक्षकांना निलंबित केले आहे. शिक्षकी पेशाला अशोभनीय कृत्य करण्याचा त्यांच्यावर आरोप आहे.