The Sapiens News

The Sapiens News

पाण्यात बुडालेले मृतदेह काढण्यासाठी गेलेल्या SDRF च्या एक अधिकारी व दोन कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी अंत

अकोले अहमदनगर : अकोले तालुक्यातील सुगाव गावाजवळ प्रवरा नदीत बुडालेल्या एका इसमासचा मृतदेह काढण्यासाठी गेलेल्या SDRF पथकाच्या एक अधिकारी दोन कर्मचारी व एक स्थानिक असे चार व्यक्ती बोट उलटल्याने बोट उलटून बुडाल्याची अतिशय दुःखद घटना काल घडली.
या घटनेत एसडीआरएफ पथकातील तिघांचा मृत्यू झाला असून दोघांचा शोध सुरु आहे. माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात घटनास्थळी दाखल झाले आहे. या घटनेबाबत प्रांताधिकारी शैलेश कुमार हिंगे यांनी पुढील माहिती दिली, काल नदीपात्रात दोन जण बुडाले. त्यातील एकाचा मृतदेह सापडला तर दुस-याचा मृतदेह शोधण्यासाठी SDRF च्या टीमला पाचारण करण्यात आले होते. सकाळी सहा वाजेपासून शोधकार्य सुरु करण्यात आले. यावेळी दुर्दैवाने SDRF ची बोट पाण्यात बुडाली. त्यात पाच जण बुडाले. त्यात तिघांचा मृत्यू झाला आहे. एकाला उपचारासाठी रुग्णालायता दाखल करण्यात आले तर एकाचा शोध सुरु आहे.

Leave a Comment

Vote Here

Loading poll ...
UPSE Coaching

Recent Posts