पोलीसास फसवणूक करणारा, लाचखोर म्हणणे म्हणजे पोलिसाची बदनामी करणेच आहे, असा निर्वाळा देत उच्च न्यायालयाने एका आरोपीविरोधातील कायदेशीर कार्यवाही रद्द करण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
मुबंई, माहिम येथील नरेश कन्हैयालाल राजवाणी यांच्याविरोधात पोलीस उपनिरीक्षक मधुकर थावण यांनी बदनामीची व्ययक्तिक तक्रार कुर्ला महानगर दंडाधिकारी यांच्यासमोर केली आहे. त्याचीच दखल घेत कुर्ला न्यायालयाने राजवाणी याच्याविरोधात ही कार्यवाही केली.
या कार्यवाहीत राजवाणी यांनी सत्र न्यायालयात आव्हान दिले. सत्र न्यायालयाने राजवाणीचा अर्ज फेटाळला. त्यानंतर राजवाणी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. ही कार्यवाही रद्द करण्याची मागणी राजवाणी यांनी केली. न्या. एन. आर. जमादार यांच्या पीठाने ही मागणी देखील अमान्य केली .
सविस्तर : थावण हे चेंबूर पोलीस स्टेशन येथे कर्तव्यावर असताना राजवाणीच्या संपर्कात आले. राजवाणी रिअल इस्टेट एजंट आहे. थावण त्याच्यामार्फत दुकान घेणार होते. नंतर त्यांच्यात काही वाद झाला. पण राजवाणीने थावण यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग वरीष्ठांकडे तक्रार केली. थावण यांच्याकडे बेहिशेबी मालमत्ता आहे, असा आरोप राजवाणीने केला. एसीबीने याची चौकशी केली. थावण यांच्याकडे बेहिशेबी मालमत्ता नसल्याचे चौकशी स्पष्ट झाले.