नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण पोलीसांनी धडक मोहीम राबविली असून कायदा व सुव्यस्था या अनुषंगाने ग्रामीण भागात समाज कंटक उपद्रवींचा बंदोबस्त करण्याबरोबरच अवैध धंदे तसेच बेकायदा वाहतुकीवर कडक कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत ३२ गावगुंडांना हद्दपार नोटीस बजावली असून २१ ठिकाणी धाडी घातल्या व कारवाई केली आहे. यात आणि ५० कारवाया प्रस्थावीत आहे. तसेच ४० पोलीस ठाणे हद्दीत या कारवाया सुरू आहे.
या सर्व कारवाया नाशिक ग्रामीण पोलीस अधिक्षक विक्रम देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली सूर आहे.
