नाशिक : सविस्तर वृत्त असे की वास्तुविषारद निलेश अर्जुन दळवी यांचे गोविंदनगर येथील विश्वज्योती अपार्टमेंटमध्ये कार्यालय आहे. त्याच शेजारील ऑफिसमध्ये प्रतीक्षा ही नौकरीस होती. ती निलेश यांच्याकडे काम शिकण्याच्या बहाण्याने येऊ लागली. अधिक ओळख होताच तिने निलेश यांच्याकडून टप्याटप्याने ५.४६ लाख ही रक्कम स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास घेतली. आज तिचा व्यवसाय सुरू होऊनही ती निलेश दळवी यांचे पैसे देण्यास तयार नाही. वरून त्यांच्यावर खोटे गुन्हे वा तक्रार नोंदविण्याची धकमी देखील देते असे दळवी यांचे म्हणणे आहे. या बाबत रीतसर तक्रार त्यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात नोंदविला आहे.
