एक मुलगी उत्तरप्रदेश 10 वीच्या परीक्षेत 5 लक्ष मुलांमध्ये पहिली आली. तिच नाव प्राची निगम जेव्हा तिची बातमी मीडियात आली.तेव्हा मात्र तिच्या या कर्तृत्वाच कौतुक करण्याचे सोडून काही लोकांनी तिला सोशल मीडियात ट्रोल करण्यास सुरुवात केली. त्याच कारण होतं तीच दिसणं मग अस काय होत तिच्या दिसण्यात ? तर तिच्या चेहऱ्यावरील केस जे विरळ दाढी व मिशातून इतर मुलींच्यापेक्षा तिला वेगळं दिसवतं होतं. हार्मोन्स असंतुलनामुळे तिच्या चेहऱ्यावर ते आलेले. ज्यात तिचा काहीही दोष नव्हता. यावर तिची प्रतिक्रिया जेव्हा एका वृत्तवाहिनीने घेतली तेव्हा ती म्हणाली की कदाचित 1,2% कमी मिळाले असते तर छान झालं असतं ज्यामुळे ती सोशील मीडियावर येवढी प्रसिद्ध झाली नसती आणि ट्रोलही. एका 14 वर्षांच्या अतिशय उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मुलीची ही परिक्रिया समाजाचा विकृत चेहरा दाखवते. एवढ्या आधुनिक व स्वतःस सुसंस्कृत दाखविणाऱ्या परंतु ते समाजा एवढेच खोटे असलेल्या समाजात आपण जगतो आहे हेच यावरून निष्पन्न होते.
The Sapiens news असल्या समाजाचा धिक्कार करण्याबरोबरच या गोजिरवण्या मुलीचे व हे ती लहानपणापासून शोषित असूनही तिच्या प्रगतीवर तिने त्याचा कोणताही दुष्परिणाम न होऊ दिल्या बद्दल तिचे खूप खूप अभिनंदन करते व तिला भावी उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देते.,
