नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरमध्ये अन्न व औषध प्रशासनाने मिठाई विक्रेत्यांवर कारवाई केली आहे. या कारवाईत अन्न व औषध प्रशासनाने तब्बल 135 किलो भेसळयुक्त मिठाईचा जप्त करून त्या साऱ्याला नष्ट करण्यात आले.
त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातील पेढा आणि खास मलाई बर्फी विक्रेत्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे. भेसळीच्या संशयावरून अधिकाऱ्यांनी टाकलेल्या छाप्यात १३५ किलो भेसळयुक्त मिठाई सापडल्यानंतर संबंधित माल जप्त करण्यात आला.
याच मंदिर परिसरातील दुकाने आणि विक्रेत्यांवर अधिकाऱ्यांनी छापे टाकले, त्यामुळे विक्रेते घाबरले. पेढे आणि स्पेशल मलई बर्फीच्या नावाने भेसळयुक्त मिठाई विकली जात असल्याचे आता समोर आले आहे.