लाचखोर पोलीस निरीक्षाकाच्या घरी सापडले 2 कोटी 35 लाखांचे घबाड
धुळे : येथील जिल्हा पोलीस विभागातील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय सखाराम शिंदे (बीड) यांच्यासह अन्य तिघांना दीड लाख रूपयांची लाच स्विकारताना पकडण्यात आले. ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभाग धुळे यांनी केली. तक्रारदार माजी नगरसेवकावर प्रतिबंधक कारवाई न करण्याच्या सबबीवर आलोसे क्र 1
यांनी तक्रारदार यांच्याकडून 1,50,000/- रुपये लाचेची रक्कम स्वीकारण्यास संमती दर्शवून सदरची रक्कम नितीन आनंदराव मोहने व अशोक साहेबराव पाटील यांना देण्यास सांगितले. सदर लाचे बाबत तक्रारदार यांनी नितीन आनंदराव मोहने व अशोक साहेबराव पाटील यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी तडजोडीअंती 1,50,000/- रुपये लाचेची रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले
आरोपींचा तपशील : दत्तात्रय सखाराम शिंदे, पद- पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, धुळे, रा. सम्राट चौक, शाहू कॉम्प्लेक्स, फ्लॅट नं. 2, बीड 2) नितीन आनंदराव मोहने, पद-पो हवा. 334, स्थानिक गुन्हे शाखा धुळे, (वर्ग- 3), रा. प्लॉट नंबर 58, गंदमाळी सोसायटी, देवपूर, धुळे. 3) अशोक साहेबराव पाटील, वय 45 वर्ष, पद- पो. हवा 1629, स्थानिक गुन्हे शाखा, धुळे. (वर्ग- 3) रा. प्लॉट नंबर 25, मधुमंदा सोसायटी, नकाने रोड, देवपूर, धुळे
दोंडाईचात यशस्वी सापळा
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रूपाली खांडवी, हेमंत बेंडाळे, पथकातील कर्मचारी राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रवीण मोरे, प्रशांत बागूल, प्रवीण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी हवालदार मोहने, पाटील यास दोंडाईचात पकडले.
लाचखोर पोलीस निरीक्षाकच्या घरी सापडले 2 कोटी 35 लाखांचे घबाड
या कारवाईनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलिस निरीक्षकाच्या घरी घेतलेल्या झडतीत सोन्याची बिस्किटे, दागदागिने, चांदीची भांडी आणि स्थावर मालमत्तेचे खरेदीखत असा एकूण दोन कोटी ३५ लाख किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला. येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धडक कारवाईमुळे पोलिस वर्तुळात खळबळ उडाली आहे.
नंतर उपअधीक्षक पाटील यांनी एलसीबीच्या कार्यालयाकडे मोर्चा वळविला. तेथे पोलिस निरीक्षक शिंदे यास चौकशीसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात यावे लागेल, असे सांगितले. तेथे चौकशीअंती शिंदे याच्या सांगण्यावरून दोघा हवालदारांनी लाच स्वीकारल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे संशयित तिघांविरुद्ध दोंडाईचा येथे गुन्हा दाखल झाला.