The Sapiens News

The Sapiens News

स्वयंभू नारीशक्ती : पाच गोष्टी ज्या महिलांना खऱ्या अर्थाने सक्षम करतील

स्व:रक्षण


रक्षाबंधन एक असा सण आहे ज्यात बहीण भावास यासाठी राखी बांधते कारण भविष्यात येणाऱ्या तिच्यावरील संकटांना भावाने सामोरे जावे, तोंड द्यावे, दूर करावे. हा सण साजरा करणे अजिबात वाईट नाही पण जर याचा उद्देश स्वरक्षणासाठी परावलंबित्व असेल तर तो उद्देश नक्कीच वाईट आहे. कारण तो महिलांची स्वरक्षणासाठीची मानसिकता कमकुवत करतो. स्वतःवर आलेल्या संकटांना तोंड देण्यासाठी तिला बापावर, भावावर, नवऱ्यावर मुलांवर, मित्र व सहकाऱ्यांवर विसंबून राहण्याचे शुकवतो. रक्षाबंधन मात्र एक उदाहरण म्हणून आहे. आपल्या समाजात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अशा अनेक गोष्टी सातत्याने होत असतात ज्यात महिलांना दुय्यम स्थान देण्याचा हेतूत प्रयत्न केला जातो. जर नवऱ्याला अहो म्हणून संबोधले जाते तर बायकोला अग का म्हणाव ? तिला ही का अहो म्हणू नये पण असे होत नाही. गोष्ट छोटी आहे पण सुरवात येथूनच होते. आपल्या संस्कृतीत पूर्वी तोच सन्मान महिलांना ही मिळे जो पुरुषांना मिळे. आश्रम वा मठाधिपती ही महिला असे. यज्ञयाग करण्याचा अधिकारण पुरुषांप्रमाणे महिलांना ही असे. परंतु परकीय आक्रमणात महिलांना व मुलांना केले जाणारे लक्ष ध्यानी घेऊन त्यांना झाकून ठेवण्याची आवश्यकता पडली आणि ती आजतागायत कायम आहे. पुराणात महिला योद्धा ही असे आणि शास्त्रच नाही तर शस्त्र कला निपुनही असे. अगदी 400 वर्षांपूर्वी जिजामाता, झाशीच्या राणी, राणी पद्मिनी, राणी रुद्रम्मा देवी सारख्या योद्धा झाल्या. ज्यांनी पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रीत्वाची क्षमता प्रखरतेने दाखविली. आजही अनेक क्षेत्रात महिला उच्चपदावर कार्यरत आहे उच्चशिक्षण घेऊन. परंतु आजही महिलांना स्वरक्षणासाठी एखाद्या पुरुषावर अवलंबून असाव लागत त्याच एकमेव कारण हे की महिलांकडे आज पुस्तक आहे पण शस्त्र नाहीत ना ती चालवण्याची क्षमता, शिक्षण आणि शास्त्र. आम्हला वाटतं महिला घराबाहेर पडतांना छान दिसण्याचा विचार करून जातात तसा स्वरक्षणाचा ही विचार व तजवीज करून जावं. छत्रपतींना जन्म देणारी अबला कशी असू शकेल हो ?

अर्थसंपन्न


स्वरक्षणा नंतर महिला सक्षमिकरणाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा मुद्दा हा की महिलांनी अर्थकारणात सक्षम असणे अधिक महत्त्वाचे आहे. ते यासाठी की शारीरिक शक्ती जशी स्वरक्षणासाठी आवश्यक आहे. तशी अर्थशक्ती ही सक्षमिकरणासाठी आवश्यक आहे. बाप, नवरा, मुलांवर दिडदमदिसाठी आयुष्यभर विसंबून असणारी महिला ही कधीच खऱ्या अर्थाने सक्षम होऊच शकत नाही. छोट्या छोट्या खर्चासाठी बहुतांश महिला ह्या पैशासाठी पुरुषांवर परजिवी असतात. अनेकदा नौकरदार महिला ही, का तर अर्थकारण महिलांपेक्षा पुरुषांना अधिक कळते हे त्यांच्या डोक्यात ठासून भरण्यात आले आहे. दुर्दैव हे की त्यांनी ही ते मान्य करून घेतले आहे अगदी निमूटपणे. असे म्हणतात जग पैशावर चालते व ज्याच्या हातात तो असतो तो सदैव शक्तिशाली असतो आणि जर ते खरे असेल तर जगातील अंदाजे 99% महिलांच्या हातात तो नाही आणि निवडक महिलांच्या हातात तो असेल तरी ही पुरुषांच्या परवानगीने, दुर्दैव हे की अनेक महिलांना ही तेच आवडते. महिला सक्षमीकरणाचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे त्यांना आधी अर्थ संपन्न करावे. कारण पुराणात ही सांगितले आहे की व्यंकटेश्वरांनाही माँ लक्ष्मी कडून कर्ज घ्याव लागल. मग आज आपण आपल्या घरातील लक्ष्मीलाच का मागणाऱ्यात ठेवले आहे ? त्याला जबाबदार मात्र पुरुष मंडळीच नाही महिला ही आहेत. अर्थकारणाचा विषय आला की त्या त्यात रस घेत नाही.

संस्कृतीदर्शन


अनेक स्त्रियांना व पुरुषांना ही आज डोक्याला गंध टिळा लावणे, कुंकू लावणे, पारंपरिक भारतीय वस्त्र नसणे गुन्हा अथवा अडाणीपणाचे लक्षण वाटते, मंगळसूत्र घालणे outdated fashion वाटते. परंतु दुसऱ्या बाजूला इसरोच्या अति उच्चशिक्षित महिला आपल्या संस्कृतीचे संवर्धन करीत चंद्रावर व मंगळवर पोहोचू शकतात हे समाजाला ही दिसते आहे. किंबहुना संस्कृतीचे अनुकरण करून आपण अधिक चांगल्या प्रकारे व खऱ्या अर्थाने वैचारिक व भौतिकदृष्ट्या समृद्ध होऊ शकतो हेच आज अनेक भगिनींना उमजत नाही आहे. भारतीय संस्कृती हे समृद्ध जीवन जगण्याच एक असं मध्यम आहे जे आपल्याला निरंतर प्रेरणा देते. मधल्या काळात त्यात आमूलाग्र बदल ही झाले आणि भ्रामक संकल्पनांनीही त्याला ग्रासले. त्या मुळे आजच्या समाजात त्या विषयी गैरसमज अधिक आहे. वाहवत चाललेली तरुण पिढी आपल्या मूलभूत आश्वासक संस्कृती पासून दूर जाते आहे, यात अनेक संकल्पनांचा चुकीचा अर्थ लावला जातो आणि त्याच पुढे नेण्यात येतात. मुख्यत्वे स्वातंत्र्याच्या निगडित. चंगळवाद आणि स्वातंत्र्याचे बीभत्स स्वरूप यात पाहायला मिळते.
या समाजात अनेकींनी त्यांचं स्वातंत्र्य स्वतःहून नाकारले असतांना ज्यांना ते आहे त्या सुसंस्कृतपणे त्याचा इतर महिलांच्या विकासासाठी उपयोग न करता पुरुषी विचारांचाच अवलंब करतात सिगारेट मद्यपीणे अश्लीलतेचे वर्तन करणे हा स्त्री व पुरुषही स्वातंत्र्याचा विषय होऊ शकतो का ?

स्वावलंबन


माता शक्ती, सरस्वती व लक्ष्मी ह्या तीनही स्त्रीचेच अवतार आहे. एकीकडे शस्त्र व शौर्य, दुसरीकडे विद्या व तिसरीकडे धन संपत्ती आहे. साक्षात ब्रम्हा विष्णू माहेशांनाही जेथे या गुणांची आवश्यकता पडली येथे त्यांनी या देवतांचे आवाहन केले. याचाच दुसरा अर्थ हा होतो की स्वयंम सिद्ध हे देव नव्हते त्या देवताच होत्या आणि वेळ प्रसंगी त्यांची अनेकदा देवादिकांनाही अशक्य असलेल्या गोष्टी लीलया केल्या व या संसारचे संरक्षण, संवर्धन जतन केले.
परंतु काळाच्या ओघात आजच्या बहुतांश महिलांना पुरुषाकडे मागण्याची पाळी आलेली दिसते. कारण दैवी शक्तीने उपजत आलेले महान वरदान गुण त्यांनी कधीच स्वतात जागृत केले नाही आणि ज्यांनी केले त्यांच्या पुढे जग नतमस्तक आहे. दुर्दैवाने त्यांचे प्रमाण अल्प आहे. धन विद्या संरक्षणासाठी ह्या आजच्या दुर्गा सरस्वती लक्ष्मी मागणाऱ्यात गणल्या जात आहे हे त्यांचं नी अवघ्या समाजाचं दुर्दैव आहे

स्त्री:सहाय्य


आज जगाच्या प्रत्येक भागात कोपऱ्यात सर्वाधिक अन्याय अत्याचार जर कुणी शोषित असेल तर त्या महिला आहे मग घर असो देश असो युद्ध असो किंवा व्यवसायीक ठिकाण स्त्री शोषण नित्याचा विषय झाला आहे.
वाईट याच वाटतं की अन्याय ग्रस्त महिलेच्या पाठी पुरुषांनीची संख्या अधिक दिसेल पण त्या प्रमाणात महिला पुढे आलेल्या दुसत नाही. मग ते मणिपूर असो की बंगाल. स्त्री असहकार्याची भावना विद्वेष अगदी घरापासून सुरू होतो ते पार्लमेंटमध्ये ही दिसतो. आज राजकारणातील अथवा शासनात उच्च पदावर असलेल्या महिला देखील महिलांचे हवे तसे रक्षण संवर्धन सक्षमीकरण करतांना दिसत नाही. किंबहुना त्यांच्यात स्पर्धा अधिक दिसते. सासू सुनेला जर त्रास देते तर सूनही सासू नणंद भाऊजयी वर खोटे गुन्हे टाकते. स्त्रियांसाठी केलेल्या कायद्याचा अनेकदा स्त्रियांना फायदा कमी व दुरुपयोग अधिक होतो. एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला ज्या प्रकारे त्रास देते ते पाहून तीच पुरुष आहे का असे वाटते. आम्हाला विश्वास आहे जर स्त्रियांनी एकमेकींना साथ देण्याचा सहकार्य करण्याचा जरी निश्चय केला तरी जगातील महिलांचा किमान 80% त्रास जाच कमी होईल आणि उद्दाम पुरुष देखील वठणीवर येईल.
आम्हाला विश्वास आहे की स्व:रक्षण, अर्थ:संपन्न, संस्कृती:दर्शन, स्वावलंबन, स्त्री:सहाय्य या पाच पंचसूत्रीच्या साहाय्याने अवघ्या स्रीजातीचे स्व:कार्यानेच कल्याण होईल. त्यासाठी अजिबात कुण्या पुरुषाची आवश्यकता नाही. कारण जी स्त्री एका भ्रूणरूपाचे संवर्धन आपल्या उदरात करून त्याला या जगाचा राजा, सम्राट, योद्धा करू शकते ती काही ही करू शकते फक्त तीच्यातील शक्ती सरस्वती लक्ष्मी जागृत व्हावी लागेल आणि ती ते स्वतःच करू शकते निसर्गानेच तिच्यात ती क्षमता निपजतच दिली आहे.


संपादक : दि सेपिअन्स न्युज
शिरीष प्रभाकर चव्हाण

Leave a Comment

Vote Here

Loading poll ...
Coming Soon
Do You Like Our Website?
UPSE Coaching

Recent Posts