The Sapiens News

The Sapiens News

‘आता सरकारकडे मागू नका, सरकार कोणते करायचे हे ठरवा’ – नाना पाटेकर

नाशिकमध्ये ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते शेतकरी साहित्य संमेलनाचे  उद्घाटन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून नाना पाटेकर यांनी सरकारच्या भूमिकेवर संताप व्यक्त केला.

शेतकरी संमेलनात नाना पाटेकरांनी ‘आता सरकारकडे मागू नका, सरकार कोणते करायचे हे ठरवा’ ;असे आवाहन  शेतकऱ्यांना केले आहे. ‘कुठले आदर्श ठेवता आमच्या पिढीसमोर तुम्ही, काय चालले आहे?’ असं म्हणत सध्याच्या राजकीय घडामोडींवरही पाटेकरांनी भाषणातून नाराजी व्यक्त केली आहे. 

महिनाभरात सर्व पक्ष संपलेले असतील, येथे मनापासून बोलता येते. यांना कधी कळणार की मृत्यू येणार, किती तो संचय करायचा, अमर असल्यासारखे काय वागतात, कुठले आदर्श ठेवता आमच्या पिढीसमोर तुम्ही, काय चालले आहे, असे म्हणत सध्याच्या राजकीय घडामोडीवर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

Leave a Comment

Vote Here

Loading poll ...
UPSE Coaching

Recent Posts