जागतिक स्तरावर आपल्या विदेशी धोरणांसाठी ओळखल्या जाणाऱ्या भारतदेशानं पुन्हा एकदा आपली कुशलता दाखवली असून, देशाची कुटनीती पुन्हा एकदा वरचढ ठरली आहे हेच सिद्ध करणारी एक घटना नुकतीच घडलीये.
2023 मध्ये अल दहरा ग्लोबल कंपनीत काम करणाऱ्या 8 भारतीयांना अटक करण्यात आली होती, ऑक्टोबरमध्ये कतारच्या एका न्यायालयानं त्यांना थेट फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर सातत्यानं भारत सरकारनं या माजी नौदल अधिकाऱ्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरु केले होते. अखेर भारताच्या प्रयत्नांना यश आलं. कतारने तुरुंगात टाकलेल्या 8 पैकी 7 नौसेनेच्या दिग्गजांची सुटका केली.