The Sapiens News

The Sapiens News

नाशिक परिक्षेत्र लाचखोरीत अव्वल की अधिकाऱ्यांची कर्तव्यदक्ष कार्यवाही ?

कोणतेही शहर किवा विभाग जेव्हा लाचखोरांना पकडण्यात त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात अव्वल असतो. तेव्हा ” तो जिल्ह्या लाचखोरीत प्रथम ” असल्या मथळ्याच्या हेडलाईन समाज माध्यमातून आपल्याला पहावयास मिळतात. परंतु वस्तुस्थिती ही असते ही त्या विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांचे कर्तव्य चोख बजाविल्याने हे साध्य व शक्य झालेले असते. म्हणून मथळे जिल्हा लाजखोरीत अव्वलचे नसून सक्षम अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यवाही परिणामकारक राबविल्याचे असावे. म्हणूनच The Sapiens News लाजलूचपत विभाग नाशिक व त्याच्या कर्तव्यकठोर अधिक्षिका शर्मिष्ठा वालावरकर – घारगे मॅडम यांचे व त्यांच्या टीमचे अभिनंदन करते.

शर्मिष्ठा वालावलकर
अधिक्षिका : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग , नाशिक

नाशिक परिक्षेत्रात (विभाग) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २०२३ या वर्षात १६१ सापळे रचून २३५ लाचखोरांवर कारवाई केली. यात नाशिक जिल्ह्यात ६२, अहमदनगर ३४, जळगाव ३२, धुळे १८, व नंदुरबार १५ याप्रमाणे सापळे रचण्यात आले. वर्षभरात महसूल विभागात ३५, पोलीस ३०, जिल्हा परिषद १५, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी १०, सहकार ८, पंचायत समिती ७, भूमीअभिलेख ७, ही विविध विभागातील कारवाईची आकडेवारी आहे. मोठया सापळ्यांमध्ये भूमी अभिलेखमधील जिल्हा अधीक्षक महेश शिंदे आणि लिपिकास ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना केलेली कारवाई, सिन्नरचा सहायक निबंधक रणजित पाटील, लिपिक वीरनारायण यांना २० लाख रुपयांची लाच स्वीकारताना झालेली अटक, शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांना ५५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक, या कारवायांचा विशेष उल्लेख करावा लागेल.

२०२३ यावर्षी राज्यात ८०३ लाचखोरीच्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यात १२७० आरोपी आहेत. सर्वाधिक १६३ गुन्हे हे नाशिक परिक्षत्रात नोंदवण्यात आले आहे. दुसऱ्या क्रमाकांवर १५० लाचखोरीच्या केसेसह पुणे परिकक्षेत्र आहे. तर १९२ आरोपीविरुद्ध असे १३० गुन्हे नोंद करणारे नाशिक दुसऱ्या क्रमाकांवर आहे. लाजखोरीत महसूल, शिक्षण, सहकार पोलीस विभाग, अव्वल आहेत.शिरीष प्रभाकर चव्हाण : संपादक The Sapiens News

शिरीष प्रभाकर चव्हाण : संपादक The Sapiens News

Leave a Comment

Vote Here

Loading poll ...
Coming Soon
Do You Like Our Website?
UPSE Coaching

Recent Posts