The Sapiens News

The Sapiens News

मोठी दुर्घटना, बोट नदीत बुडाली, 18 जण बेपत्ता, 3 जणांचे मृतदेह सापडले – News18 मराठी

बिहार, 01 नोव्हेंबर : बिहारमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. सूबे छपरा परिसरातील मांझी मटियार या परिसरात एक बोट उलटली आहे. या बोटीमध्ये 18 जण प्रवास करत होते. यापैकी 3 जणांचा मृतदेह सापडले आहे. तर 15 जण अजूनही बेपत्ता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बिहारमधील सूबे येथील छपरा या भागात ही घटना घडली आहे. मटियार या गावाजवळ बोटीमधून 18 लोक प्रवास करत होते. अचानक बोट बुडाली. या अपघातात 18 जण बेपत्ता असल्याचे सांगितलं जात आहे. आतापर्यंत 3 जणांचे मृतदेह सापडले आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. बेपत्ता प्रवाशांचा शोध घेतला जात आहे.

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस प्रशासन पोहोचले आहे. बचावकार्य सुरू आहे. आतापर्यंत 3 जणांचे मृतदेह सापडले आहे. रात्रीची वेळ असल्यामुळे बचावकार्य करण्यात अडचणी येत आहे.

दरम्यान, बोट का पलटली आहे, हा अपघात कशामुळे झाला, याची माहिती अद्याप कळू शकली नाही.घटनास्थळी जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी पोहोचले आहे. स्थानिक लोकांच्या मदतीने बचावकार्य सुरू आहे.

(सविस्तर बातमी लवकरच)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18Marathi वर.
आजच्या ताज्या बातम्या, सर्व लाइव्ह न्यूज अपडेट्स, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 मराठीवर.

Source link

Leave a Comment

Vote Here

Loading poll ...
Coming Soon
Do You Like Our Website?
UPSE Coaching

Recent Posts