The Sapiens News

दि.सेपियन्स न्युज

The Sapiens News

दि. सेपियन्स न्युज

लघु संपादकीय नोकरी आणि ताणतणाव

मी आजही समजू शकत नाही की ज्या नौकरीत अस्वस्थता असते तेथे कुणी कसे राहू शकते. काहीतर अगदी डायबेटिक हॉटपेशंट होईस्तोवर ती नौकरी सोडत नाही आणि कारणे असतात. आर्थिक विवंचना मग त्यात लोन,मुलांचे करिअर भविष्यातील आर्थिक नियोजन. मला वाटतं लोक मनातून खूप असुरक्षित असतात. एवढे की नोकरी गेली तर आयुष्य संपले. विशेषतः पोलीस विभागातील लोक जे खूप काही सहन करतात ते आणि त्यांचं शरीर अगदी ट्रेनिंग पासून ते निवृत्ती पर्यंत निरंतर मनात एक घालमेल असुरक्षितता घेऊन जगते आणि याला अपवाद अधिकारी ही नसतात. प्रश्न हा की त्यांचा विचार योग्य असतो का ? तर अजिबात नाही. अहो नियोजनच असे करा की तुमचे आर्थिक भविष्य हे नोकरी लागण्या पासूनच्या 15, 20 वर्षातच पूर्ण होईल. मग त्या नंतर जे मिळेल ते बोनस. पण आपण अती लोभात आणि 0 प्लॅनिंग नसल्याने जीवन फरफटत नेतो. आणि अगदी 58 वर्ष कुढत जगतो. अर्थात हे प्रामाणिक लोकांच्या बरोबर अधिक होत. एक सांगू देवाने प्रत्येकास पोट, चोच, भूक देताना ते भरण्याची तजवीज ही केली. पण आपण त्याच्या प्लॅनिगवर विश्वास ठेवीत नाही ना आपले प्लॅनिंग धड करतो. मला हेही माहित आहे चुकीचे आदेश जे आत्मसन्मानाची लक्तरे तोडतात ते ऐकायला कुणालाच आवडत नाही परंतु ऐकावे लागतात का तर आपण सर्वार्थाने कमकुवत असतो.

Leave a Comment

Vote Here

Loading poll ...
UPSE Coaching

Recent Posts