माझ्या ओळखीचा एक इंजिनिर व एक MSC अगदी गुणवत्तापूर्ण उत्तीर्ण झालेली मुले वेळी दीड वर्षांपासून घरी म्हणजे बेरोजगार आहेत. ते कमी की काय एक BH/AMS डॉ ची ही हीच स्थिती आहे. वाईट हेच नाही अगदी MBBS चे ही काही छान नाही. हे झाले एक पण मी अशा एका मुलीला ओळखतो जी BMM उत्तीर्ण झाली आहे. तिला 35K ची नौकरी मिळते. येथे BMM हे 90% लोकांना माहीतही नाही. थोडक्यात ज्या शिक्षणाला समाज प्रतिष्ठेचे व उच्च मानतो त्याची अगदी वाईट वाट लागलेली दिसते आणि जो अभ्यासक्रम बहुतांश समाजाला माहिती नाही त्यात मुले सुंदर success मिळवीत आहे. निदान इंजिनिअर डॉ पेक्षातर कितीतरी अधिक. Hight तर तेव्हा होते जेव्हा एक सुमन धामणे नावाच्या 74 वर्षीय आजी महिना 6 लक्ष ₹ केवळ कुकिंगचे व्हिडीओ अपलोड करून youtube कडून मिळवितात. ज्यांना ना नीट लिहिता येत ना वाचता. यावरून सामान्य पालकांनी काही आवश्यक ते शिकणे अत्यावश्यक आहे आणि ते आहे. पालकांनी मुलांच्या शिक्षणाचे विचार बदलणे आवश्यक आहे. कारण लोक आजारी पडू इच्छित नाही आनंद मिळवू इच्छिता अगदी छोटया छोट्या गोष्टीत, आज लोकांना खूप उदात्त भव्यदिव्य मोठे वा गँभीर असे काही नको आहे. त्यांना हलकं फुलक आल्हाददायक छोटंसं सुंदर या क्षणच सुख हवं आहे. आणि तो जो देईल त्यासाठी लोक वेळ आणि पैसे मोजयला तयार आहेत कारण लोक आज हा क्षण सुंदर करू इच्छिता खूप पुढचा विचार नाही जे काही प्रमाणात छान ही आहे.
