नाशिक : नवीन नाशिकच्या उत्तमनगर परिसरात वास्तव्यास असलेल्या पियुश गुलाब पाटील या अठरा वर्षांच्या तरूणाने गळफास घेत आत्महत्या केल्याचे वृत्त आहे. युवकाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस नाईक आवारे करीत आहेत.
