The Sapiens News

दि.सेपियन्स न्युज

The Sapiens News

दि. सेपियन्स न्युज

आदित्य गोल्ड सोसायटी परिसर : उत्साहवर्धक वातावरणात विधिवत होलिका पूजन 

नाशिक : येथील उंटवाडी येथे जगताप नगर आदित्य गोल्ड सोसायटी परिसरात होलिका पूजन मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात विधिवत पद्धतीने पार पडले. या प्रसंगी वडीलधाऱ्या मंडळींबरोबर बालगोपालांनीही या आपल्या पारंपरिक उत्सवाचा आनंद घेतला.


तसेच वडीलधाऱ्या मंडळींनी मुलांना या सणाचे महत्व सांगत होलिका रचनेत एक छोटेसे खड्डे खणून त्यात एक खोबऱ्याची वाटी व काही दक्षिणा ठेऊन ऊस व यरेंडोलाच्या फांदी बरोबर हरडे करडे व माळ फुले हार वाहत बाजूने लाकूड गौऱ्या रचून होळीला रचण्याचे प्रशिक्षण देखील दिले होळी भोवती सडा रांगोळी काढून मैदान सुशोभित करण्यात आले. यावेळी बहुतांश नागरिक हे पारंपरिक वेशात उपस्थित होते तसेच त्यांनी एकमेकास होळीच्या शुभेच्छा ही दिल्या.

भारतीय संस्कृती व संस्कार जतन करण्याच्या दृष्टीने व त्याचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने हे आपले सण व उत्सव मोलाचे योगदान देतात त्याचप्रमाणे आपल्या संस्कृतीचे महत्व नवीन व तरुण पिढीला ही जाणू देण्याकरिता ही यांचा सिंहाचा वाटा असतो. असे येथील जेष्ठ नागरिकांचे निवेदन होते.

Vote Here

[TS_Poll id="1"]
UPSE Coaching

Recent Posts