The Sapiens News

दि.सेपियन्स न्युज

The Sapiens News

दि. सेपियन्स न्युज

संपादकीय : मानवतेला कालीमा फासणार,श्रीलंका LTT युद्ध

युद्ध किती क्रूर असते याचे एकच देशाचे दोन किस्से सांगतो. श्रीलंकेत तब्बल 26 वर्ष श्रीलंका सरकार आणि एलटीटीत युद्ध चाललं 1983 ते 2009 कारण 2009 ला सर्वेसर्वा प्रभाकरण याला श्रीलंकन आर्मीने संपवलं परंतु या युद्धा दरम्यान तिची परिशिमा नाही. आधी LTTE चे सांगतो आयरिश आर्मी नंतर जर कुणी मानवीबॉम्बचा अस्खलित आणि मोठ्या प्रमाणात वापर केला असेल तर ती LTTE आहे. यांच्याच्या पेक्षा वाईट करिता निदान श्रीलंकेत तरी फक्त श्रीलंकन आर्मीने दाखविली असावी. LTTE भारताने श्रीलंकेत पाठविलेल्या शांतीसेनेची रेकी करी त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की एक भारतीय ब्रिगेडियर हे त्यांच्या आर्मी कॅम्प जवळील गावातील लहान मुलांबरोबर अतिशय प्रेमाने मागे कारण त्यांना लहान मुले खूप आवडे ते त्यांच्याबरोबर अनेकदा बॉलच्या साह्याने अनेक खेळ खेळ नेमका याचाच चालाखीने उपयोग करून एलटीटीने खेळाच्या बॉल मध्येच एक शक्तिशाली ग्रॅनाईट फिट केले आणि ह्या निरागस मुलांच्या हातात देऊन त्या ब्रिगेडरला उडवले त्यांनी हे करताना हा देखील विचार केला नाही की ज्या मुलांच्या हातात तो बॉम्ब असलेला बॉल दिला तो फुटल्यावर ही लहान गोजिरवाणी मुले देखील मरतील परंतु त्यांनी ते केले आणि या हल्ल्यात त्या ब्रिगेड बरोबर अनेक निरगस मुले देखील मारले गेले. किती क्रूरता ? आणि दुसरा किस्सा एलटीटीई इतिकर आणि वरचढ होत चालली होती की श्रीलंकन सरकारला काहीतरी करणे आवश्यक होते. म्हणून त्यांनी त्यांच्यापेक्षा अधिक क्रूर होण्याचे ठाणले ते श्रीलंकेत असलेल्या तमिळ गावांमध्ये जात आणि तेथील नागरिकांना उचलून आणत खबरी म्हणून आणि एल टी टी च्या लोकांच्या इन्फॉर्मेशन मिळवण्याकरिता ते या नागरिकांना एका खांबाला बांधित आणि त्यांच्या तोंडात फक्त आणि फक्त श्रीलंकेत मिळणारा एक एक फुटाचा अत्यंत विषारी साप सोडी अगदी जीवन माणसाच्या तोंडात जिवंत साप सोडी आणि हा साप पोटात गेल्यानंतर सर्व आतडे कातडे तोडून खाई आणि पोटातच मरून जाईल तुम्ही विचार करू शकतात काय त्या भयानक यातना होत असतील त्या व्यक्तीला जेव्हा लोकांना कळी की ते असे करणार आहे ते सोडण्याची नाही मृत्यूची भीक श्रीलंकन सैन्याकडे मागे परंतु श्रीलंकन सैनिक त्यांना सोडत नसेल असे करण्याचे आणि एक कारण देखील असे साप पोटातली आतडी खात असल्यामुळे शरीरावर जखमा किंवा चट्टे वगैरे काही दिसत नसेल आणि संबंधित कैद्यांना मानवी पद्धतीने अब्युज करण्यात आले हे सिद्ध करणे मानवी हक्क तसेच युनायटेड नेशनला सुद्धा शक्य होत नसेल. सुरुवातीला तर अनेक वर्ष हे लक्षात देखील आले नाही की लोक एवढ्या मोठ्या प्रमाणात का मारत आहेत हे युद्ध संपल्यावर समजले आणि श्रीलंकन सरकारच्या अनेक सैनिकांवर आंतरराष्ट्रीय कोर्टात गुन्हे देखील दाखल करण्यात आले. श्रीलंकेला अशा अमानवी कृत्य करण्याने सर्वात मोठा फायदा हा झाला की पुढे जाऊन एलटीटीई ला किंवा एलटीटी च्या सैनिकांना कोणीही साथ न देऊ लागले तसेच सैनिकांमध्ये देखील दहशत पसरली की आपण पकडले गेल्यानंतर आपल्या बरोबर काय होईल आणि अर्थातच ते श्रीलंकेच्या पथ्यावर पडले

शिरीष प्रभाकर चव्हाण
संपादक दि.सेपिअन्स न्यूज तथा माहिती अधिकार कार्यकर्ता

Vote Here

[TS_Poll id="1"]
UPSE Coaching

Recent Posts