श्रीमंत आणि गरिबाच्या मुलांच्या शिक्षणात एक मूलभूत फरक असतो श्रीमंत मुलांना गोष्टी बनवायला शिकवतात आणि गरीब त्या वापराला. थोडक्यात एक उत्पादक होतो आणि दुसरा उपभोक्ता. गरीबाचा मुलगा आयफोन घेण्याचे स्वप्न पाहतो. श्रीमंताचा आयफोनची एजन्सी. 9 शब्दांच्या या एका वाक्यात गरिबाची दरिद्रता आणि श्रीमंतांची संपन्नता प्रखरतेने जाणवते. हा वैचारिक फरक जसा आहे तसाच एक मोठा फरक आहे. गरीब मुलांच्या शिक्षणावर लाखो रुपये खर्च करतो आणि स्वप्न पाहतो त्याचा मुलगा एक दिवस छान नौकरी मिळवेल. खरतर नोकरी या शब्दातच नोकर येत असला तरी गरीब तो आवडीने स्वीकारतो. म्हणजे लाखो रुपये खर्च करून आणि अनेक वर्ष तो शारीरिक मानसिक आर्थिक कष्ट केवळ यासाठी घेत असतो कारण त्याला त्याच्या मुलाला नौकर बनवायचं असते. मग प्रश्न हा की श्रीमंत लोक मुलांना शिकवत नाही का ? तर उत्तर नाही आणि हो ही आहे. श्रीमंत लोक मुलांना नोकर बनवणारे शिक्षक देत नाही आणि श्रीमंत लोक मुलांना ते शिकवतात जाणे ते व्यावसायिक होतील किंवा अधिक संपन्न. दुर्दैवाने अशी शिक्षण संस्था अजून तरी मिळत नाही किंवा ते न मिळावे यासाठीच शिक्षण तज्ञ शिक्षण सम्राट शासन यांचा प्रयत्न असतो आणि जर ते मिळाले तर श्रीमंतांना नोकर मिळणार नाही कारण सर्वच मालक असतील तेही संपन्न. ही भीती भारतीय श्रीमंतांना नेहमी असते भारतीय यासाठी म्हणतो कारण भारतीय स्वतःला श्रीमंत करण्यासाठी प्रयत्न करतो. समाजाला किंवा देशाला नाही. खरंतर चायना मॉडेल प्रमाणे बहुसंख्य लोक श्रीमंत होऊ शकतात आणि पर्यायाने देश व समाजही जेव्हा एकाच देशात बहुसंख्य उद्योजक होतात त्यावेळी ते त्यांचा माल विकण्यासाठी सिमे बाहेरच्या बाजारपेठा शोधतात त्या मिळतात देखील आणि त्याचवेळी कुणी एक विशिष्ट व्यक्ती किंवा गट श्रीमंत होत नाही तर अवघा समाज श्रीमंत होतो हे चायनाने दाखवून दिलेला आहे.
