The Sapiens News

दि.सेपियन्स न्युज

The Sapiens News

दि. सेपियन्स न्युज

कतर अटॅक आणि ट्रम्प नीती

ट्रम्प किती भयानक व्यक्ती आहे याचे एक आत्ताच काल घडलेले उदाहरण सांगतो. काल इजराइल ने हमास लीडर वर कत्तरची राजधानी दोहा येथे हल्ला केला आणि त्यात हमासचे बरेच सुप्रीम लीडर मारले गेले. कत्तरवर इजराइलकडून अशा प्रकारे हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ आहे. तसेच कत्तर स्वतःला जगाचा शांती दूध म्हणवतो परंतु जगातील सर्व आतंकवादी संघटनांचे हेडकॉटर कतरमध्येच आहे विशेष म्हणजे कत्तरचे स्वतःचे ऑफिशियल असे आतंकवाद्यांना प्रोत्साहन देणार आणि त्यांचं ग्लोरीफिकेशन करणार चैनल देखील आहे ज्याचं नाव अल जजिरा. विशेष म्हणजे जगात कुणीही कतरला त्रास देत नाही त्याचं एकमेव कारण कत्तर हा अमेरिकेने पाळलेला सर्वात जवळचा कुत्रा आहे. त्याचबरोबर अमेरिकेचे दहा हजार सैनिक हे कतरमध्ये तैनात आहे. अर्थात मिडल ईस्ट आणि इस्लामिक देशांवर राज्य करायला. अशा कतरच्या राजधानीत अतिशय प्राईम लोकेशनला हमास लीडरचा खात्मा घडवून आणला. आता सर्वांचा हा समज होईल की अमेरिका इजराइल वर रागवेल परंतु असे न होता ट्रम्प ने सोशल मीडियावर हे टाकले की आम्ही कतरला त्यांच्यावर इजराइल हल्ला करणार आहे याची पूर्व सूचना दिली होती. संबंधित मेसेज ट्रम्पच्या ऑफिशियल हँडलवर येताच कतरने लागलीच कळवले की अमेरिकेने असं काहीही आम्हाला हल्ला होण्यापूर्वी कळवलेलं नाही त्यांनी कळवलं परंतु हल्ला झाल्यानंतर. हा एक ट्रम्पचा डंबिसपणा उघडा पडला. त्यावरही सोशल मीडियावर हे देखील टाकलं की आम्ही कतरला कळवले आहे की आमच्या डिफेन्स मिनिस्टरशी भेटून तुमच्या सुरक्षे विषयीचा अधिक सुधारित करार अमेरिकेबरोबर करावा. याचाच दुसरा अर्थ हा होतो की अमेरिका तुमचं संरक्षण करेल परंतु त्यासाठी तुम्हाला अमेरिकेला मोठी किंमत द्यावी लागेल. विशेष म्हणजे ट्रम्प हे सोयीस्कर विसरले की आत्ताच कतरने 400 मिलियन डॉलरची डील अमेरिकेबरोबर केली आता ट्रम्प कतरला सांगता आहे की आमच्याबरोबर संरक्षण करार करा नाहीतर इजराइल येऊन पुन्हा मारेल आहे ना सर्वात डंबिस आणि चालू व्यक्ती ? पण असो कत्तरसाठी असेच हवे.

Vote Here

[TS_Poll id="1"]
UPSE Coaching

Recent Posts