निवृत्त झाल्यावर एका रात्री हवालदाराचा PSI झालेल्या मित्राचा कॉल आला. आवाजात आर्त होता. मी म्हटले काय झाले. म्हणाला plz घरी ये मग बोलू मी घरी गेली. हॉलमध्ये त्याची बायको आणि तो बसलेला होता म्हणाला मला VRS घ्यायचा आहे मला माहिती दे. मी म्हटले तुझे दीडवर्ष राहिले आहे का घेतो VRS ? म्हणाला आता सहन होत नाही खूप त्रास वाढला आहे नको नको होते SP ने जगणे अवघड केले आहे. त्याकडे होतो तेव्हा ही खूप मानसिक त्रास दिला बदली मागितली तर शेवटच्या काळात मालेगावला फेकले PSI होऊन देखील काही फायदा झाला नाही दरमहा 15 ते 20 K खर्च होतो त्यात मधुमेह वाढला आहे. या वयात नाही सहन होत एकतर सर्व पगारवरच आहे. त्यात हा त्रास आणि SP नाराज म्हणून इतर वरिष्ठ व कर्मचारी देखील सहकार्य करीत नाही काही तर डिवचतात. सर्व सर्विस साईड ब्रांचला गेली निवांत. परंतु आता हा त्रास होतो आहे शेवट शेवट. त्रास देणारा हा ही विचार करीत नाही की माझं वय काय, मला आजार काय, माझे कौटुंबिक प्रॉब्लेम्स काय ? तो खूप दुःखी होता तरी देखील मी एक सल्ला दिला थोड्यासाठी सोडू नको. दहा-पंधरा वर्ष असते तर ठीक होतं आता दीड वर्षासाठी. परंतु हे सांगताना देखील मला वाईट वाटत होतं कारण त्या रात्री तो माझ्याजवळ रडला अगदी त्याच्या बायको समोर. मला आजही कळत नाही वरिष्ठ केवळ आपल्या इगो साठी कुणाला अगदी आत्महत्या करण्याच्या मानसिकते पर्यंत त्रास तरी कसा देऊ शकतात त्यांच्यातला माणूस कुठे ….. संविधामाने दिलेल्या अधिकारांचा केवळ आपल्या अहंकारासाठी वापर करण्याची मानसिकता यांच्यात येथेच कुठून ? वाईट हे आहे की हा त्रास प्रत्येक पदावरील व्यक्तीस होतो. मग तो अधिकारी असो किंवा कर्मचारी आणि तो देतात विभागातीलच काही लोक पण का ते माहित नाही कदाचित त्यांच्यातला असून जागा होत असेल.
