The Sapiens News

The Sapiens News

आदित्य गोल्ड सो. येथे “स्त्री सन्मान सोहळा” उत्साहात साजरा

उंटवाडी नाशिक : येथील आदित्य गोल्ड सोसायटीत दरवर्षीप्रमाणे या ही वर्षी अतिशय सुसंस्कृत, शालीन आणि आनंदमय वातावरणात स्त्री सन्मान सोहळा पार पडला. या कार्यक्रमाची सुरुवात ही वयोवृद्ध मातांच्या आदरपूर्वक सत्काराने करण्यात आली. ज्यात सोसायटीतील सर्व वृद्ध महिलांचा पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. तसेच त्यांनी आपल्या चिमुकल्या पिलांकरिता वेचलेल्या अपार कष्ठांसाठी त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

वयोवृध्द मातांचा सत्कार

त्यानंतर तरुण व प्रौढ दाम्पत्तांनी त्यांचे कौटुंबिक व एकमेकांप्रति सुंदर अनुभव कथन केले. ज्याने उपस्थित श्रोते भावुक झाले. अनेक अनुभवांनी अनेकांच्या डोक्यात पाणी ही तरारले. सांसारिक जीवनात येणाऱ्या अडचणींवर मात करीत एकमेकास आधार देत पतीपत्नी कसे मार्ग काढतात याचे प्रत्येक दाम्पत्यांचे विचार श्रवणीय होते नी प्रेरणादायी ही.

मुलांच्या व स्वताच्याही दुखान्यांना, आर्थिक बाबीना, सामजिक अडचणीना तोड देत. एक पत्नी आई कशी घर सांभाळून घेत नवऱ्यास मानसिक आधार देते त्याचे अतिशय सुंदर अनुभव स्वतः नवऱ्यांनी कथन करने हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य होते.

त्यानंतर कुमारी महिलांचा ही सत्कार करण्यात आल. हेच नाही सामजिक बांधिलकी जपत कार्यक्रमाच्या स्नेहभोजना करिता आलेल्या स्वयंपाकि महिला भगिनींचाही सत्कार या कार्यक्रमाची शान व मान उंचावून गेला.

या कार्यक्रमाकरिता आदित्य गोल्डच्या सर्वच सभासदांनी मागील आठ दिवस परिश्रम वेचले त्याचा समारोप या अतिशय आनंददायी व प्रेरणादायी वातावरणाने झाल्याचे समाधान हे सर्वच सभासदांना होते.

Leave a Comment

Vote Here

Loading poll ...
UPSE Coaching

Recent Posts