The Sapiens News

दि.सेपियन्स न्युज

The Sapiens News

दि. सेपियन्स न्युज

आपले महाराष्ट्र पोलीस

      ऐन दिवाळी सणाच्या दरम्यान आलेल्या विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. आज प्रत्येक वर्ग मग तो गरीब श्रीमंत, उच्चशिक्षित अशिक्षित नौकरदार व्यापारी, नेता अभिनेता, कार्यकर्ता, स्त्री, पुरुष अगदी तृतीयपंथीय देखील आपल्या घरात आप्तस्वकीयांबरोबर आनंदात सणाचा व विधानसभा निवडणुकीचा देखील आनंद घेत आहे. सर्वांच मस्त लागून सुट्यांचा उपभोग ही घेता येणार आहे. मुलांना नविन कापडे, फटाके, पत्नी, आई वडील व स्वतासही खरीदी करण्यासाठी भरपूर वेळ ही मिळणार आहे. या सणासुदीला मित्रमंडळी, नातेवाईकांच्या बरोबर छान गप्पा ही होतील.

       पण याला अपवाद फक्त एक प्राणी आहे आणि तो म्हणजे आपला पोलीस दादा आणि त्याचे वरिष्ठ. ही सर्व मंडळी एका मोठ्या व लोकशाहीत ज्याला अनन्यसाधारण महत्व आहे अशा निवडणूक कामात उन्हातान्हात वेळकाळेची तमा न बाळगता आपल्यासाठी रात्रंदिवस जीव ओतून कष्ट वेचीत आहे आणि त्यांना आपल्याकडून एकच अपेक्षा आहे सहकार्य करा आणि सन्मानाने वागवा.
म्हणूनच दि. सेपिअन्स न्युज आपणा सर्वांना एकच विनंती करते. त्यांच्या एवढया विनंतीची आठवण ठेवा.

Vote Here

[TS_Poll id="1"]
UPSE Coaching

Recent Posts