राजकारणाची व राजकारण्यांची एक अतिशय सुंदर गोष्ट वा गुण आहे आणि तो म्हणजे ते शत्रुत्व, वैर, द्वेष हा वेळ येताच वा वेळ साधून तात्काळ विसरतात क्वचितच असे होते की तो फारकाळ खेचला जातो. आत्ता हेच पहा ना या फोटोत जे भाषण देत आहे. ते कल्याणराव पाटील माजी खासदार येवला. ज्यांच राजकारण 0 वर आलं ते 2004 विधानसभा निवडणुकीत तेही आज पाटील ज्यांचा प्रचार करीत आहे त्या छगन भुजबळां येवला मतदारसंघाची निवडणूक जिंकल्यामुळे. तब्बल 20 वर्षांचा विजनवासच त्यांना मिळाला. आता भुजबळांचे, त्यांनी शिवसेना व धनुष्य सोडलं आणि शरदजींचे त्यावेळचे पंजा व नंतर घड्याळ हाती घेतले. जशी वेळ सरली त्यांनी पवारांना सोडलं पण घड्याळ त्यांच्या बरोबर आपसूकच आलं ते अजितजींच्या नेतृत्वात. पण कोणताही पक्ष स्वबळावर निवडणूक लढू शकत नाही म्हणून गळ्यात 20 वर्षा पूर्वी सोडलेला धनुष्यबाण ही आला घड्याळाबरोबर. जो कल्याणरावांचा ही होता अनेक वर्षे. नंतर मशाल आली ती ही त्यांनी सोडली आणि आज त्यांना ही घड्याळ पाहावं लागत आहे.
सारांश : किती गोष्टी बदलता ना राजकारण्यांच्या काळा बरोबर नाही ? हो पण या बदलात जनतेचं नक्की काय बदलत हो ? तीच बेरोजगारी, तिच गरिबी, तोच संघर्ष रोजचा अगदी रत्यावरून (की खड्यातून ?) जातांनाही, तोच कार्यकर्त्यांचा वाद, द्वेष, शत्रुत्व मग असे का होते हो कार्यकर्त्यांचे ?त्याच एकच कारण जो जिव्हाळा, प्रेम, सौहार्द वेळेचा अचूक वेध राजकारण्यांना जमतो त्यात कार्यकर्ता एकदम ढ असतो. जनतेने व पंटर लोकांनी ही या राजकारण्यांच्याकडून काय शिकायला हवं हे आत्ता सांगायला नको. तरी सांगतो आपले मायबाप हे जन्मदाते असतात. त्यांची जागा कुणाला देवू नका. गुण्यागोविंदाने राहा एकमेकात राजकारण्यांसारख आणि एक आवर्जून शिका त्यांच्याकडून त्यांच्या इन्व्हेस्ट पहा व गुंतवणूक कुठे आणि कशा केल्या आहे ते ही. सर्वात महत्वाचं या फोटोत जेही स्टेजवर आहेत ना ? त्यांना व त्यांच्या विरोधकांनाही निवडणूक हरो वा जिंको फार काही फरक पडत नाही. कारण त्यांचं सर्वात जास्त लक्ष आपल्या प्रगतीकडे व घराकडे असतं नी ते योग्यच आहे. परंतु आपले ?
