नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी नाशिक विभागातील नाशिक, नंदुरबार, धुळे, अहिल्याबाई नगर, जळगाव या जिल्ह्यांत एकूण ६४८४८ मतदारांनी मतदान केले. याची मतमोजणी नाशिक येथील अंबड, केंद्रीय वखार महामंडच्या, गोदामात तीस टेबलवर होत आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी मतमोजणीच्या तयारीची पाहणी केली. तसेच मतमोजणी संदर्भातील आवश्यक त्या सूचना त्यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या.
