The Sapiens News

दि.सेपियन्स न्युज

The Sapiens News

दि. सेपियन्स न्युज

५०० रुपयांची लाच स्वीकारतांन गीता हेमंत बोकड या विद्युत विभागाच्या शिपाई महिलेस अटक

गीता हेमंत बोकड (वय ४५ रा. गणेश वस्तू अपार्टमेंट अशोक नगर नाशिक) या विद्युत कार्यालयातील शिपाई महिलेस ५०० रुपयांची लाच स्वीकारतांन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. संबंधित महिलाने ठेकेदार व पर्यवेक्षक परवाना मिळविण्यासाठी ही लाच घेतल्याचे समजते. संबंधित महिले विरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा घारगे- वालावलकर, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक गायत्री जाधव, हवालदार संदीप वणवे, हवालदार ज्योती शार्दुल यांनी केली.