धुळे: जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात ग्रामसेविकेस १५ हजार रुपयांची तर, साक्री पंचायत समितीच्या ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यास एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. या दोन्ही कारवाया सोमवारी सायंकाळी झाल्या.
