नाशिक : गंगापूर धरण येथील बोट क्लबवरून येतांना अनुक्रमे कु. रिध्दी प्रशांत गुजराथी (१८) रा. खोडेनगर, पंचवटी व रवींद्र धारणकर (१८) काठे गल्ली, व्दारका हे जागीच ठार झाले. हा अपघात गंगापूर रोडवरील बारदान फाटयाजवळ झालं. अपघातात गाडीत पुढे बसलेले दोन जण आयर्न फडकर (१८) व मृण्मयी अहिरे (१८) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.
यांच्या गाडीचे टायर फुटल्याने गाडीने दोन पलट्या घेतल्या. अपघातात मृत झालेले तरुण तरुणी हे मागे बसले होते. कदाचित त्यांनी सीट बेल्ट लावला नसावा. जे बचावले ते पुढे बसलेले होते. अपघात होताच स्थानिक मदतीसाठी सरसावले. पुढील तपास गंगापूर ठाण्याचे पोलीस करीत आहे.
