The Sapiens News

दि.सेपियन्स न्युज

The Sapiens News

दि. सेपियन्स न्युज

इलेक्ट्रोल बाँड व सँटियागो मार्टिन

पार्श्वभूमी : इलेक्ट्रोल बाँड हे असे बॉण्ड आहे जे सरकार बँकांमार्फत वितरित करते. जी एखादा व्यक्ती किवा संस्था विकत घेते आणि राजकीय पक्षांना फंड म्हणून देते. Inshort इलेक्ट्रोल बाँड हे राजकीय पक्षांना कायदेशीर फंड देण्याचे माध्यम असून त्याद्वारे कोणताही व्यक्ती अथवा संस्था ही कायदेशीर मार्गाने राजकीय पक्षांना बँकांचे हे इलेक्ट्रोल बाँड खरीदी करून देऊ शकते जे राजकीय पक्ष त्या त्या बँकेत जाऊन रोख रकमेत परावर्तित करू शकतात. इलेक्ट्रोल बाँड हे मोदी सरकारने सुरू केले असून या मागील उद्देश एकच की राजकारणात येणाऱ्या काळ्या पैशास प्रतिबंध व्हावा.
परंतु संबंधी संकल्पनेत मोदी सरकारने एक नियम केला होता की बँकांकडून ज्या व्यक्तीने अगर संस्थेने बॉण्ड खरीदी केले त्याची नावे जाहीर करणे बँकांना किवा संबंधित पक्षाला बंधनकारक नाही. ज्यावर सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आल्याने व सुप्रीम कोर्टाने ही संबंधित व्यक्ती व संस्थांची नावे जाहीर करावी असा आदेश दिल्याने SBI ने निवडणूक आयोगास जो डेटा दिलेला तो १३/०३/२०२४ रोजी त्यांच्या वेबसाईटवर नावांन जाहीर केली. ज्यात सँटियागो मार्टिन हे नाव पुढे आले ज्यांनी व त्यांच्या कंपनीने सर्वाधिक म्हणजे 1368  कोटी रु चे इलेक्ट्रोल बाँड खरीदी केले.

कोण आहे सँटियागो मार्टिन ?
हे नाव वेळोवेळी प्रसार व समाज माध्यमांवर आले असून मूळ कोयम्बतुर येथील future gaming and Hotel services चे सर्वेसर्वा आणि भारतातील लॉटरी किंग म्हणून ओळखले जाणारे  सँटियागो मार्टिन हे जग भरातील विविध लॉटरी असोसिएशनच्या बॉडीवर विविध पदावर कार्यरत आहे. त्यांचे ऑफिस जरी कोयम्बतुर येथे असले तरी कंपनीचा सर्व कागतोपत्री व्यवहार हा कोलकत्ता येथून चालतो.
सँटियागो मार्टिन यांच्या कंपनीने तब्बल 1368 कोटी रुपयांचे इलेक्ट्रोल बाँड खरीदी केले. ऑक्टोबर 2020 ते जानेवारी 2024 या काळात ही खरेदी झाली. या कंपनीवर भूतकाळात ED च्या अनेक कारवाया ही झाल्या आहे.

Vote Here

[TS_Poll id="1"]
UPSE Coaching

Recent Posts