The Sapiens News

दि.सेपियन्स न्युज

The Sapiens News

दि. सेपियन्स न्युज

राहुल गांधींनी त्रिम्बकेश्वर मंदिरात केले अभिषेक व पूजन

भारत जोडो यात्रे नंतर राहुल गांधींचे आणि एक अभियान न्याय यात्रा आज नाशिक जिल्ह्यात पोहोचली याच अनुषंगाने राहुल गांधींनी आज मोखाड्याच्या दौऱ्यावर जाण्याआधी त्रिम्बकेश्वर येथे मंदिरात अभिषेक व महापूजा केली. त्यांच्या बरोबर प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते बाळासाहेब थोरात, जेष्ठ नेते राजाराम पानगव्हाणे, आमदार हिरामण खोसकर, संपतराव सकाळे उपस्थित होते.

विश्वस्त तथा पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेटे, ललीत लोहगावकर आदींनी पूजा पौरोहित्य केले. दरम्यान विश्वस्त मंडळाचे चेअरमन न्या. नितीन जीवने, विश्वस्त कैलास घुले, पुरूषोत्तम कडलग, स्वप्नील शेलार, रूपाली भुतडा यांनी त्यांचे स्वागत केले. मंदिराचे संबंधात माहिती दिली. मनोज थेटे हे गांधी यांचे वंश परंपरागत तीर्थ पुरोहित आहेत त्यांनी राहुल गांधी यांना वंशावळ दाखवली.

Vote Here

[TS_Poll id="1"]
UPSE Coaching

Recent Posts