The Sapiens News

दि.सेपियन्स न्युज

The Sapiens News

दि. सेपियन्स न्युज

नाशिकच्या व्यापाऱ्याचे अपहरण व खंडणी वसुली

नाशिकमधील व्यापाऱ्याचे अपहरण करून त्यांच्याकडून १२३०००० रुपयांची खंडणी घेतल्याची घटना उघड आहे.

याबाबत सविस्तर वृत्तात असा की, गुप्ता या व्यापाऱ्यांचे पिस्तूलाचा धाक दाखवून चौघांनी अपहरण केले. त्यानंतर त्यांना मध्यप्रदेश येथे नेत १२३०००० रुपयांची खंडणी उकळली.

गुप्ता यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांना चार संशयितांनी पिस्तूलचा धाक दाखवून कारमध्ये बळजबरीने बसवले. अपहरणकर्त्यांनी गुप्ता यांना त्यांच्या मध्यप्रदेश येथील देवास या मुळगावी नेत त्यांच्याकडे पैशांची मागणी केली.

अपहरणकर्त्यांनी एटीएममधून ३०,००० रुपये व रोख स्वरुपात १२,००००० रुपये घेतले. पैसे मिळाल्यानंतर आरोपींनी गुप्ता यांना बसस्थानकावर सोडून पोबारा केला.

गुप्ता हे नाशिकला परतल्यानंतर यांनी म्हसरुळ पोलिस स्टेशन चौघांविरोधात तक्रार दिली असून पुढील तपास म्हसरुळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ PI सुभाष ढवळे यांच्या मार्गर्शनाखाली पोलीस करीत आहेत.

Vote Here

[TS_Poll id="1"]
UPSE Coaching

Recent Posts