ती हो ती एवढी सुंदर होती की तिच्या सारखी त्यावेळी कुणीच नव्हती
ती आली की वृद्धांच्या ही डोळ्यात एक चमक यायची
तिला पाहून तरुण घायाळ व्हायचे
अगदी अशी 360 डिग्री मान फिरवायचे.
तिचा रुबाब असा की मुलींनाही तिचा हेवा वाटे
मुले तिच्याकडे आकर्षित झालेले पाहून त्याच्या मनी कुतूहल दाटे
तशी ती किशोरवयात आली व तारुण्यातच गेली अवघी 10 11 वर्षच ती आमच्या बरोबर होती
मग तीच दर्शन दुर्मिळ झाल
तशी ती आजही दिसते आम्ही प्रौढ झालो
पण ती तिचा रुबाब पहिल्या एवढाच टिकवून आहे.
आज तिला पाहताच आमचं अल्लड तारुण्य आठवतं.
तिच्या विषयी असलेली आसक्ती आज हसवते
आम्ही किती वेडे वेडे होतो हेही जाणवते.
ती प्रत्येक तरुणाच स्वप्न होती पण नशीबात मात्र काहींच्याच होती.
कारण तिला वागवंन, सांभाळणं अगदी अवघड होतं.
ती वेगवान होती जलद होती
पण आमच्या बाण्यास शोभतही होती.
अहो ती गोल चेहऱ्याची बांधेसूद अंगकाठीची आणि 90 cc ची होती अहो ती यामाहा RX100 होती.
ती आमचा मान, सन्मान, अगदी अभिमान ही होती
हे वर्णन ही कविता 1985 च्या साली आलेल्या आणि 1996 च्या दरम्यान निर्मिती बंद झालेल्या पण अवघ्या 10 वर्षात धुमाकूळ घातल तरुणाईचं काळीजच झालेल्या यामाहा RX100 या गाडीच आहे क्वचितच या गाडी एवढी भुरळ त्या वेळच्या तरुणांना कुणी घातली असेल तिचा आवाज तिचा LOOK तीच सगळच कमाल होती आणि ज्याच्याकडेही ती असायची त्याची सर्वत्र अगदी धमाल होती.
काही कारणास्तव RX100 यामाहाला बंद करावी लागले असे म्हणतात की ती प्रदूषण जास्त करण्यामुळे शासनाच्या नियमात बसत नव्हती. म्हणूण बंद करावी लागली. पण नेमकं कारण आजही कुणाला नाही सांगता येत. त्यावेळी होंडा CD 100 होती आणि बऱ्याच गाड्या होत्या. परंतु RX100 ची शानच ओर होती तिच्या सारखी बाईक परत इतर कंपन्यांनाच काय खुद्द यामहाला देखील नाही बनवता आली कदाचित त्याचमुळे आजही 30, 35 वर्षे जुन्या RX 100 ची ही लाख लाख किंमत आहे. जी त्यावेळी 19764 रुपयाला मिळे तसे ही किंमत त्यावेळी त्यावेळचे लाख रुपयेच होती विशेष हे की ती मिळणे ही तसे अशक्यच.
अशी ही बाईक त्यावेळची पहिली स्पोर्ट्स बाईक होती. तीला 90 cc 2 स्ट्रोक एयर कुलिंग इंजिन लावले होते. जे 11 bhp ची पावर व 10.39 NM चा टोर्क जनरेत करी विशेष हे की ही बाईक केवळ 7 सेकंदात 100 किमी प्रति तास वेग पकडे त्यावेळच्या कोणत्याही बाईकमध्ये एवढी पावर नव्हती आणि हीच तिची खासियत होती.
या बाईकची add यावेळच्या टॉप क्रिकेटर सुनील गावसकर करी. असे म्हणतात गुन्हेगार त्या बाईकचा वापर अधिक करू लागले म्हणून तिला बंद करण्यात आले. कारण काहीही असो त्याने अनेक तरुणांची मने मात्र तुटली जी आजही तिचे दुर्मिळ दिसते तेव्हा जोडण्याचा प्रयत्न ही मंडळी करतात खोटं वाटते ना मग विचारा 90 च्या दशकातील तरुणांना आणि पहा त्यांच्या डोळ्यात Rx100 नावाची 85 ते 96 ची चमक.
