आज दिनांक 28/01/2025 रोजी आयुक्त व अतिरिक्त आयुक्त यांच्या सूचनेनुसार उपायुक्त अतिक्रमण मयूर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वडाळा घरकुल येथे अनाधिकृत भंगारची दुकाने तसेच इतर अवैध अतिक्रमण काढण्यात आले तसेच राजीव नगर झोपडपट्टी येथील अतिक्रमण धारकांना अतिक्रमण काढण्याच्या सूचना देण्यात आल्या त्याचबरोबर त्रिमूर्ती चौक येथील ओपन स्पेस मधील अनधिकृत पक्के दुकान तोडण्यात आले इतर व्यवसायिकांना त्यांच्या शेड तोडण्याच्या सूचना देण्यात आल्या पोटे काढायचे सूचना दिल्या तसेच पवन नगर भाजी मार्केट येथील अतिक्रमण काढण्याच्या सूचना देण्यात आल्या यावेळी विभागीय अधिकारी राजाराम जाधव श्रीमती बैरागी तसेच नवीन नाशिक नाशिक पूर्व व इतर विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. एकूण तीन ट्रक साहित्य जमा करण्यात आले.
