जनतेला छोट्या छोट्या नियमभंगाला दंड करणारी ही RTO प्रणाली स्वता मात्र अतिशय वर्दळीच्या ठिकाणी अगदी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारा समोर गाडी पार्क करून ऐटीत अधिकारने उभे होती जसे संपूर्ण रस्ता यांचाच आहे. दुर्दैव हे की यांना पेन्शन व इतर कामाकरिता आलेल्या व ट्राफिकमध्ये अडकलेल्या आबालवृद्धांची त्यांच्या गैरसोयीची देखील काळजी नाही. मुख्य रत्यावर असे बेपर्वा वर्तन कसे जमते यांना ?विचारणा केली तर महिला RTO अधिकारी म्हणतात थोडावेळच काम होते. म्हणून इथे पार्क केली.
