The Sapiens News

दि.सेपियन्स न्युज

The Sapiens News

दि. सेपियन्स न्युज

20 तारखे नंतर

The Sapiens News
“Social Journalism”

20 तारखेनंतर एकही नेता गद्दार, बटेगा, कटेगा, भ्रष्ट, लाचखोरी, 50 खोके, विविध शिवराळ भाषेचा धनी नसेल. कोणत्याही नेत्याच्या पत्नी, आईवडील, मुलेमुलीचा उद्धार होणार नाही, पुतण्या काकांच्या पाठीत खंज्जीर खुपसणार नाही, काका पुत्रपुत्री प्रेमापोटी पुतण्याला डावळणार नाही. सर्व पुतन्यांचा DNA एक नसेल. मग प्रश्न काय नसेल. मोफतचे मटण, मद्य नसेल. पाण्याचा, नौकरीचा, महागाईचा, रत्याच्या प्रश्न मात्र असेल. महिना भर चाललेला राजकीय सिनेमा नसेल. ड्रग्ज असेल. 20 तारखे नंतर नवीन सिनेमा रिलीज होईल. कार्यकर्त्यांची खुन्नस, बदला, केसेस, आर्थिक तंगी. त्याची मात्र पुढील पाच वर्षे सिनेमा हॉलवर डायमंड जुबली होईल. हिरो व्हिलन कार्यकर्ता असेल. त्याचा आनंद मात्र राजकीय नेते घेतील. कारण आज आपण ही त्यांच्या 1 महिनाभर सुरू असलेल्या सिनेमाचा आस्वाद घेत आहोत. त्यांचा सिनेमा जनतेच्या सिनेमापेक्षा छोटा आहे. कारण संख्या कमी जनतेच्या तुलनेत. सिनेमा चालो नी चालो त्यातील हिरो नी व्हिलन ही गरीब, भिकारी, दिवाळखोर वा रत्यावर आलेला नसेल. तो तेव्हाही आलिशान गाडी, बंगाल, ऑफिसमध्येच असेल. कारण त्यांना मजबूत मानधन मिळते. जे जनतेस मिळणे अवघड असते. चला वाचून झाले असेल तर नेत्यांचा सिनेमा पाहायला. शेवटचे काही तासच तर राहिले आहे. नाही तर पुढील 5 वर्षी ब्लॅक ने तिकीट घेण्याची कुवत असेल तरी सिनेमा पहायला मिळणार नाही.

Vote Here

[TS_Poll id="1"]
UPSE Coaching

Recent Posts