“ही एक कस्टमाईज बॅग आहे. यामध्ये कोणतंही चामडं वापरण्यात आलेलं नाही. कस्टमाईज म्हणजे तुमच्या इच्छेप्रमाणे ती बॅग तयार केली जाते. यामुळे त्यावर माझं नावही लिहिण्यात आलेलं आहे. मी कधीच चामड्याचा वापर केलेला नाही आणि करणारही नाही. जे माझ्या कथेसाठी येतात त्यांना चांगलंच माहिती आहे की, मी कधीही हे सर्व मोहमाया आहे असं सागत नाही. पैसे कमवू नका किंवा सगळं सोडून द्या असं मी बोलत नाही,” असा दावा जया किशोरी यांनी केला आहे.
