प्रत्येक लाचखोराचा गणित विषय खूप कच्चा असतो कदाचित. आत्ता हेच पहा ना. काल सातपूर पोलीस ठाण्यातील एक ASI व एक हवालदार केवळ दोन हजारांची लाच स्वीकारतांन रंगेहात पकडले. संबंधित माणसाकडे बक्षिस मागत होते म्हणे. आत्ता या महाभागांना काय सांगावे बक्षीस म्हणून लाच मागितली तरी ती लाचच असते.
शिवाय यांचं गणितही किती कच्च हो. निव्वळ 2 हजारांची लाच मागून 65 हजार पगाराची नौकरी कुणी पणाला लावते का हो ? वरून पेंशन व इतर देयके ही लटकली. त्यावर आईबाप, पत्नी, मुले यांची सामजिक बदनामी वेगळीच. निदान बायकोने तरी विचारावे ना पगारा व्यतिरिक्त घरात जो पैसा येतो. तो येतो तरी कुठून ? पण माऊली नाही विचारणार तिला फक्त माहेरी देखावा करणं आवश्यक वाटतं. तिला हेच नाही कळतं की पकडल्या गेल्याची जाहिरात आत्ता तिच्या श्रीमंतीचे कौतुक करणारे नातेवाईकच करतील ते ही free. या लाचखोरांचं एक छान असत बुवा सगळं फ्री मिळतं.
![](https://www.thesapiensnews.com/wp-content/uploads/2025/01/download-7.jpeg)