इस्रायलने शनिवारी (26 ऑक्टोबर) इराणवर भीषण हल्ला केला. इस्रायली लष्कराने या हल्ल्याला दुजोरा दिला असून इराणच्या लष्करी तळांसह तेहरान आणि आसपासच्या शहरांवर बॉम्बफेक करण्यात आल्याचे सांगितले. त्यामुळे यादरम्यान तेहरानसह आजूबाजूचा परिसर स्फोटांनी दणाणला.
