जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज मतदानाला सुरुवात झाली आहे. जम्मू-काश्मीरमधील 7 जिल्ह्यांचे मतदार 10 वर्षांनंतर आज विधानसभा निवडणुकीत मतदान करणार आहेत. ऑगस्ट 2019 मध्ये कलम 370 रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील ही पहिली विधानसभा निवडणूक आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्या टप्प्यातील प्रचाराचा दणदणाट सोमवारी (16 सप्टेंबर) सायंकाळी थांबला. आज मतदान आहे. 24 जागांसाठी आज मतदान होणार आहे. जम्मू-काश्मीरमध्ये भाजप, पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसशिवाय इतर छोट्या पक्षांनीही आपले उमेदवार उभे केले आहेत. याशिवाय 24 जागांवर अपक्ष उमेदवारही नशीब आजमावत आहेत.