नाशिक : सविस्तर वृत्त असे की, नाशिक येथील पाथर्डी फाटा येथे हरिविश्व सोसायटीत वास्तव्यास असलेल्या व सध्या अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागा येथे अप्पर पोलीस अधीक्षक असलेल्या अनिल पवार या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्याच घरात २९ ते ३० जुलै दरम्यान घरफोडी झाली असून त्याची प्रत्यक्ष तक्रारच अनिल पवार यांनी दिली आहे. या फिर्यादीत त्यांच्याकडील माेलकरीण मावशीने दिलेल्या माहितीनुसार, फ्लॅटचे बाहेरील कुलूप लागलेले होते, मात्र आतील कुलूप तोडलेले होते. तसेच सीसीटीव्ही व डीव्हीआरची तोडफोड केल्याचे ही आढळून आले आहे. अनिल पवार यांनी पाहणी केली असता बाहेरील कुलूप त्यांनी लावलेले नव्हते. त्यामुळे कुलूप तोडून घरात पाहणी केल्यावर घरातील बेडरुममधील कपाटातून ३ लाख ३२ हजार रुपयांची रोकड, ४५ हजार रुपयांची दीड ताेळे वजनाची सोन्याची चेन, २२ हजार रुपयांचा टीव्ही, २ हजार रुपयांचा रेडिओ, चांदीच्या मूर्ती असा ऐवज चोरट्याने चोरला आहे असल्याचे समजते.
