आज म्यानमारमध्ये मुसलमान, बांग्लादेशात हिंदू, अफगाणिस्तान, पाकिस्तानमध्ये हिंदू ख्रिश्चन शीख, गाजात मुसलमान, चीनमध्ये मुसलमान युरोपात ख्रिश्चन मरतो आहे असे आपल्याला वाटते. विरुद्ध धर्मातील व्यक्ती मेला तर आपल्याला आनंद होतो आणि आपला मेला तर दुःख. अर्थात सगळीकडे माणसाला कापल्या जाळल्याचा आनंद आणि दुःख का तर एकाच कारणाने मेला किवा मारला यात धर्म शोधणारी राक्षसी वृत्ती मोठी.
पण कुणालाच लक्षात येत नाही की जोही मरतो आहे आणि त्याला मारतो आहे तो धर्मा आधी माणूस आहे. जो धर्म मारायला शिकवत असेल तर खरंच तो धर्म आहे का ? हा प्रश्न येथे पडतो त्याच उत्तर सर्वांकडे आहे पण देतं कुणी नाही कारण मारणारा धर्मच हत्यार घेऊन मारतो आहे आणि मरतो आहे तो धर्मच कारणं जर धर्मासाठीच मरता नी मारता आहेत तर धर्म चालवायला पुढील काळात कुणी जगेल का ? हा प्रश्न ही त्यांना विचारणे गरजेचे आहे.
