भारताची कुस्तीपटू विनेश फोगट हीने तिला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अतिरिक्त वजन असल्याने अपात्र ठरवल्याच्या विरोधात आंतरराष्ट्रीय क्रीडा लवाद (CAS) कडे अपील केले आहे. अंतिम सामन्यादिवशी विनेशचे वजन फक्त १०० ग्रॅम जास्त असल्याने तिला महिलांच्या ५० किलो वजनी गटाच्या फायनलमध्ये सहभाग घेण्याची परवानगी मिळाली नाही. उपांत्य फेरीत ५-० अशा फरकाने विजय मिळवणारी विनेश ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरीसाठी पात्र ठरणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू होती.
