मुंबई : बेकायदेशीर बांधकामावर कारवाई न व्हावी यासाठी 2 कोटीची लाच मागितल्याच्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने, मुंबई यांनी मुंबई महापालिकेच्या पदनिर्देशित अधिकारी मंदार तारी या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी 2 व्यक्तींना एसीबीने अटक केली असून. या दोघांना ७५ लाख रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे.
मंदार अशोक तारी हे घाटकोपर (पूर्वे) येथील महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालयात पदनिर्देशिक अधिकारी म्हणून कार्यरत आहे. मुंबई एसीबीने याप्रकरणात मोहम्मद शहजादा यासीन शाह (३३) आणि प्रतीक विजय पिसे (३५) यांना मंगळवारी तक्रारदाराकडून ७५ लाख रुपये लाच म्हणून स्वीकारताना अटक केली.