राज्य शासन आणि एनएसडीसी इंटरनॅशनल लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथे कोशल्यअधिष्ठित अभ्यासक्रम केंद्र पुणे येथे स्थापण्याचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित करार करण्यात आला यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस ही उपस्थती होते.
तसेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक प्रमोद नाईक,सचिव स्मिता गाडे, एनएसडीसी इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी वेदमणी तिवारी, एनएसडीसी इंटरनॅशनल कंपनीचे सल्लागार संदीप कौरा, उपाध्यक्ष नितीन कपूर, राष्ट्रीय कौशल्य विकासचे प्रमुख मोहम्मद कलाम, व सर्व विभागाचे प्रधान सचिव व संबंधित अधिकारी ही उपस्थित होते.
शासनाच्या कौशल्य विकास व उद्यमशिलता मंत्रालयाकडून प्रसिध्द करण्यात येणाऱ्या रोजगाराच्या नवनवीन संधींच्या अनुषंगाने एनएसडीसी इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीकडून कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम राबविण्यात येतात.
