राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांनी मंत्रालयातील वित्त व नियोजन विभागाच्या कार्यालयात पुणे- नाशिक ग्रीनफिल्ड सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग आणि अलिबाग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय समवेत अन्य महत्त्वपूर्ण प्रकल्पांचा आढावा घेतला. यावेळी राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री श्री. हसन मुश्रीफ, राज्याच्या मुख्य सचिव श्रीमती. सुजाता सौनिक आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
