उंटवाडीत दोन प्रकरणात गेले 80000
सध्या एमएनजीएलच्या गॅसच्या (MNGL) नावाने फार मोठ्या प्रमाणात फायनान्शिअल फ्रॉड होत असून एमएनजीएलच्या नावे
खोटे फोन येतो व ओटीपी मागितले जातात अथवा आलेल्या link ला allow करण्याचा मेसेज येतो मेसेजला allow करतात संबंधित व्यक्तीच्या बँक खात्यातून पैसे कापले जातात. त्यासाठी कारण सांगितले जाते की तुमचं कनेक्शन आजच्या आज कापले जाईल ते टळायचे असल्यास पाठवलेल्या link वर click करा तुम्ही आमच्या लिंक वरती क्लिक करून तुमचे बिल भरा याला बळी पडून किंवा या डिस्कनेक्ट होण्याच्या प्रक्रियेला घाबरून अनेक लोक आलेल्या फोनप्रमाणे प्रक्रिया करतात आणि त्याचवेळी त्यांच्या अकाउंटमध्ये असलेले सर्वच्या सर्व पैसे लप्पास होतात आणि तसा डिडक्ट झाल्याचा मेसेज बँकेकडून येतो.
सर्वात महत्त्वाची गोष्ट हा सर्वात मोठा फायनान्शिअल फ्रॉड सध्या मोठ्या प्रमाणात प्रचलित असून यासाठी दक्षता घेण्याची नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे.
यासाठी घ्यावयाची काळजी
1 अनोळखी कॉल उचलून नका
2 आलेला कॉल cut करून कुणाचा आहे ते चेक करा.
3 काही शंका वाटल्यास तात्काळ नंबर block करा.
4 जर चुकून पैसे गेलेच तर तात्काळ 1930 या नंबरवर call करून तक्रार नोंदवा.
5 www.cybercrime.gov.in तसेच तात्काळ या वेबसाईटवर जाऊन ही तक्रार नोंदवा
6 स्थानिक पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवा त्याच बरोबर आपल्या बँकेला ही सर्व व्यवहार block करण्याची विनंती करा.
7 केलेल्या सर्व ठिकाणच्या तक्रारींची सत्यप्रत व अर्ज बँकेला द्या.
8 तक्रारीचा ईमेल व 1930 चा कॉल फ्रॉड होण्याच्या दोन तासांच्या आत केल्यास पैसे मिळण्याची शाश्वती अधिक असते.